ग्रामपंचायत उधवा

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार उधवा या गावात सुमारे ६०० कुटुंबे राहतात. एकूण लोकसंख्या ३०२९ असून त्यापैकी १५१७ पुरुष व १५१२ महिला आहेत. हे गाव तलासरी तालुक्यात, महाराष्ट्र राज्यात स्थित आहे.

गावात प्रामुख्याने आदिवासी (वारली) व कुणबी समाजातील लोक राहतात. कुणबी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असून भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. आदिवासी समाजातील लोक शेतमजूर, वीटभट्टी मजूर तसेच इतर मजुरीची कामे करतात. काही कुटुंबे कुक्कुटपालन व बकरीपालन करून आपला उदरनिर्वाह करतात.

श्रावण महिन्यात, गणपती उत्सवाच्या पूर्वीच्या काळात, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये रानात एक नैसर्गिक भाजी उगवते, तिला ‘अळंबी’ असे म्हणतात. ही भाजी अत्यंत चविष्ट व पौष्टिक असते. मात्र ती उगवल्यानंतर लगेचच काढावी लागते, अन्यथा ती फुलून खाण्यास अयोग्य होते.

पहाटे लवकर उठून अळंबी शोधून फुलण्यापूर्वीच खुडून स्वच्छ करून ती बाजारात विक्रीसाठी नेली जाते. पावसाळ्यात आदिवासी बांधवांना अळंबी संकलनामुळे अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
३०२६ 
पुरुष लोकसंख्या
१५४७ 
महिला लोकसंख्या
१४७९ 
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
४५८ 
अनुसूचित जाती (SC %)
८.४३ %
अनुसूचित जमाती (ST %)
४५.५७  %

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
अंगणवाडीहोय

11

होय
प्राथमिक शाळाहोय8होय
माध्यमिक शाळाहोय2होय
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रहोय2होय
समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय3होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय6नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:  ग्रामपंचायत उधवा 

बँकेचे नाव :  महाराष्ट्र ग्रामीण बँक

शाखेचे नाव: उधवा 

अकाउंट नंबर : 55608032253  

आई एफ एस सी कोड : MAHG0005608

पत्ता : ग्रामपंचायत उधवा 
ता. – तलासरी , जि. – पालघर ( ४०१६०६  )